७९९ रुग्णांनी घेतला मनपाच्या फिजिओथेरपी केंद्राचा लाभ

– दिव्यांग अन् ज्येष्ठांसाठी फिजिओथेरपी केंद्रात नि:शुल्क सेवा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ फिजिओथेरपी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवा माफक दारात उपलब्ध करण्यात आल्या असून, ६ ऑक्टोबर पासून आजवर ७९९ रुग्णांनी मनपाच्या फिजिओथेरपी केंद्राचा लाभ घेतला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह ,सदर रोग निदान केंद्र आणि महाल रोग निदान केंद्र येथे फिजिओथेरपी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

फिजिओथेरपी केंद्र कार्यान्वित करणेबाबत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात आणि अतिरिक्त आयुक्त(शहर) आंचल गोयल यांचे मार्गदर्शनात आरोग्य विभाग कामकाज करीत आहेत. फिजिओथेरपी केंद्र सामान्य नागरिकांकरिता लाभदायक ठरतील असे प्रतिपादन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) आंचल गोयल सूद यांनी केले आहे. याकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांचे चमू कार्य करीत आहेत.

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर यांनी सांगितले की, फिजिओथेरपी ही एक विज्ञान-आधारित आरोग्य सेवा आहे जी लोकांना सामान्यपणे हलण्यास आणि कार्य करण्यास मदत करते. यात अनेक प्रकारच्या उपचारांचा समावेश असू शकतो. दिव्यांग व्यक्तीप्रमाणे वृध्द व्यक्ती,गरोदर स्त्रिया.गंभीर आजार असलेले रुग्ण यांना देखील शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी फिजिओथेरपी सेवेची आवश्यकता भासते. आजवर ६ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत एकून ७९९ रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

उपलब्ध सेवा :-

१) मॅन्युअल थेरपी:- वेदना, जडपणा आणि सूज मध्ये मदत करण्यासाठी सांधे मोबिलायझेशन, मसाज आणि स्ट्रेचिंगचा समावेश आहे.

२) व्यायाम :- मूळ समस्यांवर उपचार करण्यास मदत करते.

३) ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व्ह स्टिम्युलेशन (टीईएनएस) थेरपी: फिजिओथेरपीमध्ये वापरली जाणारी उपचार पद्धती

४) याव्यतिरिक्त चुंबकीय थेरपी, ड्राय सुईलिंग आणि यक्युपंक्चर, टेपिंग, हायड्रोथेरपी,डायथर्मी, अल्ट्रासाऊंड आणि फोनोफोरेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मनुष्यबळ :-

पदभरती महानगरपालिका मार्फत करण्यात आलेली आहे. व प्रत्येक केंद्र येथे १ फिजिओथेरपीस्ट व परिचर यांची नेमणूक करण्यात येईल.

साधने :- आरोग्य विभाग द्वारे पुरविण्यात येत आहे. (short Wave Diathermy,UV radiation, Muscle stimulator, TENS, Traction, Ultra Sound Machine etc)

वरील उपकरणांमुळे मेंदूचे संतुलन आणि समन्वय, मांस पेशीचे कार्यक्षमता वाढविणे,विविध आजारांवरील उपचार करणे, लहान बालकाचे मेंदू विषयक आजारावर उपचार करून त्यांची वाढ विकसित करणेस मदत होत आहे.

फिजिओथेरपी केंद्र व लाभार्थी रुग्ण संख्या

इंदिरा गांधी रुग्णालय, गांधी नगर- २२५

पाचपावली सुतिकागृह- ५१

सदर रोग निदान केंद्र- २०६

हिवरी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र- ३१७

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमेरिकी मीडिया में विद्रोह, ट्रंप या हैरिस

Sun Nov 3 , 2024
– मीडिया के भीतर से ही चुनौती के स्वर उभरने लगे नई दिल्ली :- क्या किसी अखबार को चुनाव में किसी भी उम्मीदवार का सर्मािन करना चाहिएं. अमेरिकी मीडिया में तूफान मच गया है. मीडिया के भीतर से ही चनौती के स्वर उभरने लगे है. बहुत बहस हो रही है कि, पत्रकारिता क्या है? भारत में गोदी मीडिया के करण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com