– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (19) रोजी शोध पथकाने 75 प्रकरणांची नोंद करून 31700 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3200 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 5000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. जादुगर बादशाह विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. सेंटर पॉईंट हॉस्पीटल यांच्या विरुध्द वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकल्याबद्दल रु. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. बीयानी स्वीटस यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे.रीतीक स्वीटस यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. चावला क्लीनीक यांच्या विरुध्द वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकल्याबद्दल रु. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.