आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून 67 जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन होणार

– खरपुंडी येथे प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे हस्ते शुभारंभ

गडचिरोली :- नीती अयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूर प्रकल्प “वाढिव साठवण आणि भुजलपुनर्भरण याव्दारे पाण्याचा ताण कमी करण्यासाठी जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे” या प्रकल्पाचे प्रभारी जिल्हाधिकारी, धनाजी पाटील, यांचे हस्ते खरपुंडी मामा तलाव (ख.क्र.218) येथे शुभारंभ झाला. त्यांनी नीती आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेले गाळमुक्त तलावांचे उद्दिष्ट प्राप्त करुन तालावांची साठवणुक क्षमता आणि भुजल पुनर्भरणाचा प्रकल्प यशस्वी करु असे सांगितले. या कार्यक्रमाकरीता परिवीक्षाधीन आयएएस राहुल मीणा, महेंद्र गणवीर तहसिलदार गडचिरोली, सावन जयस्वाल जिल्हा जलसंधारण अधिकारी, नियाज मुलाणी नोडल अधिकारी आकांक्षित जिल्हा कार्यक्रम, गावातील ग्रामसचिव तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. गडचिरोली जिल्हयात अस्तित्वातील 67 पाणीसाठ्यांचे पुनरुज्जीवन होणार आहे.

अस्तित्वात असलेल्या जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे योजनेचा कालावधी 1 मार्च 2023 ते 28 फरवरी 2024 राहील. तलावाची निवड करण्याकरीता संबंधीत ग्रामपंचायतीने तलावातून उत्खनन केला जाणारा गाळ वापरणाऱ्या लाभधारक शेतकऱ्याची यादी यात शेतकऱ्याचे नाव, स.नं., आराजी व वापरण्याचा गाळाचे परिमाण घ. मी./ ग्रास इ. तयार करुन त्या प्रमाणे तलावाची निवड करण्यात यावी. निवड केलेल्या तलावातून प्रती तलाव 3530 ग्रास (10,000 घ.मी.) एवढा गाळ काढणे अपेक्षीत आहे. गाळ उत्खननासाठी प्रती घ.मी. रु.30. प्रमाणे दर निती आयोगा मार्फत निश्चित करण्यात आलेला आहे. तलावातून उत्खनन केलेला गाळ लाभधारक शेतकरी यांनी स्वखर्चाने (गाडी व भाडे) शेतात पसरविण्यासाठी घेवून जाणे अनिवार्य आहे. याकरिता शासनाकडून कुठलाही निधी उपलब्ध करुन दिला जाणार नाही. झालेल्या कामाचे मुल्यमापण व संनियंत्रण जिल्हा परिषद लघु पाटबंधारे या विभागाच्या संबंधीत उपविभागामार्फत करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याच्या कामासाठी वाहतूकीस प्रतिबंध

Thu Jun 1 , 2023
नागपूर :-  सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाकरीता शहर प्रकल्प टप्पा 3 मधील रस्ता क्र. 3 आझाद चौक ते लाकडीपूल व रस्ता क्र.5 मनिपुरा चौक ते लाकडीपूल, आयचित मंदिर हा रस्ता वाहतूकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे . हा आदेश 14 नोव्हेंबर 2023 पर्यंत अंमलात राहील. महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 236 (1) अन्वये आझाद चौक ते लाकडीपूल व रस्ता क्र. 5 मनिपुरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com