भारतातील 66 विमानतळ 100% हरित ऊर्जेवर कार्यरत

-देशातील दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरू विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेची (ACI) स्तर 4 पेक्षा जास्त मान्यता प्राप्त करून बनले कार्बन तटस्थ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कार्बन तटस्थतेच्या दिशेने काम करण्यासाठी आणि भारतीय विमानतळांच्या कार्बन अकाउंटिंग आणि रिपोर्टिंग फ्रेमवर्कचे मानकीकरण करून देशातील विमानतळांवर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे

– नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानतळांवरील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी भारतीय विमानतळांवरील कार्बन उत्सर्जनाची नोंद आणि अहवाल सादरीकरणाचे प्रमाणीकरण करून, कार्बन तटस्थ बनण्याच्या दिशेने काम करण्याच्या आणि देशातील विमानतळांवर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने उचलली पावले

नवी दिल्ली:- नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने (एमओसीए), विमानतळांवरील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी, भारतीय विमानतळांचे कार्बन अकाउंटिंग (कार्बन उत्सर्जनाची नोंद) आणि रिपोर्टिंग फ्रेमवर्कचे (अहवाल) प्रमाणीकरण करून, कार्बन न्यूट्रल (तटस्थ) बनण्याच्या दिशेने काम करण्याच्या आणि देशातील विमानतळांवर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

त्यासाठी, निर्धारित विमान उड्डाणे असलेल्या विमानतळ परिचालकांना संबंधित विमानतळांवर कार्बन उत्सर्जनाची नोंद ठेवण्याचे, आणि टप्प्याटप्प्याने कार्बन तटस्थता आणि निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या दिशेने काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. एमओसीए ने ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी करणाऱ्या विकासकांना आणि संबंधित राज्य सरकारांना कार्बन तटस्थता आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने काम करण्याची सूचना दिली असून, यामध्ये हरित ऊर्जेचा वापर समाविष्ट आहे.

भारत सरकारच्या या प्रयत्नांमुळे, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरू यासारख्या विमानतळांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेची (ACI) स्तर 4 पेक्षा जास्त मान्यता प्राप्त केली आहे आणि हे विमानतळ कार्बन न्यूट्रल बनले आहेत. याव्यतिरिक्त, भारतातील 66 विमानतळ 100% हरित ऊर्जेच्या मदतीने कार्यरत आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंह (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत टेक्स 2024 साठी मुंबईत रोड शो

Tue Dec 5 , 2023
– भारताचे महा वस्त्रोद्योग प्रदर्शन -भारत टेक्स 2024 मध्ये मुंबई आपल्या वस्त्रोद्योगाची ताकद दर्शवेल – भारत टेक्स 2024 सर्व क्लस्टर्सना एकत्र येण्यासाठी आणि आपली यशोगाथा जगासमोर मांडण्याची मोठी संधी पुरवेल – रोहित कंसल, अतिरिक्त सचिव, वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई :- ‘भारत टेक्स 2024 ‘सर्व क्लस्टर्सना एकत्र येण्यासाठी आणि आपली यशोगाथा जगासमोर मांडण्याची मोठी संधी पुरवेल, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com