देशभरात २४ तासांत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, केरळमध्ये सर्वाधिक २६५ रुग्णांची नोंद

– देशभरात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले 

नवी दिल्ली :- करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चे रुग्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दुसऱ्या बाजूला देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. संपूर्ण भारतात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरात एकूण ३२८ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी २६५ रुग्ण केरळमधले आहेत.

एका बाजूला केरळमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटलं आहे की, “सध्याची ही आकडेवारी फारशी चिंताजनक नाही. कारण, करोनाशी लढण्यासाठी आपली आरोग्यव्यवस्था सक्षम आहे.” दरम्यान, केरळपाठोपाठ उत्तर प्रदेशातही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिल्लीत बुधवारी केवळ चार करोनाबाधित रुग्ण होते जे गुरुवारी सात झाले आहेत. यापैकी चार रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

दरम्यान, ‘जेएन.१’चा एक रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराशी सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल १०२ रुग्ण आढळले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी रेल्वे स्थानकावर पुरी जोधपुर सुपरफास्ट एक्सप्रेस व रिवा नेताजी सुभाषचंद्र बोस एक्सप्रेसला मिळाला थांबा

Fri Dec 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी रेल्वे स्थानकावर काल 21 डिसेंबर पासून जोधपुर पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस व रिवा इतवारी एक्सप्रेस थांब्याला सुरुवात झाली आहे . कामठी येथे सैनिक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून सैनिक प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने येत असतात, कामठी येथील हजारो नागरिक प्रत्येक दिन रेल्वेने नागपूर येथे कामानिमित्त जाणे येणे करीत असतात कामठी रेल्वे स्थानकावर अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!