सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 64 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरवार (ता. 25) रोजी उपद्रव शोध पथकाने 64 प्रकरणांची नोंद करून 43 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 16 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरवार (ता. 25) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या कालु बांगळे कॉटन मार्केट आणि गुरुकृपा किराणा स्टोर्स 02 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत मलिका फॅशन भगवाघर आणि मंकळवारी झोन कीड्जी स्कुल बाबा फरीद नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 15 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 04 प्रकरणाची नोंद करून 25 हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सच्चिदानगर व लाडेकर लेआउट या जोडावरील नागरिकांना मच्छरांचा भयंकर त्रास ? पुलाचे अर्धवट काम ठप्प, मनपाच दोषी ! नागरिकांचा आरोप 

Fri Apr 26 , 2024
– सच्चिदानंद नगरातील पुलाचे सिमेंट नाल्याचे बांधकाम अधुरे ! – नाल्या नजिकच्या नागरिकांना मच्छरांचा भयंकर त्रास  नागपूर :- दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोडवरील सचिदानंद नगरातील व लाडेकर ले -आउट यांच्या जोडावर असलेल्या पुलाच्या नाल्याचे बांधकाम काही ठिकाणी होऊन, काही काम अचानक थांबविल्या गेलेले आहे. सच्चिदानंद नगर व लाडीकर ले आउटच्या जोडावरील लोकांची कोंडी होत पुलाचे बांधकाम ठप्पच आहेत. येण्याऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com