आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली; ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पं.जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त म.न.पा.व्दारा अभिवादन

Fri Nov 15 , 2024
नागपूर :- भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील पं.जवाहरलाल नेहरु यांच्या तैलचित्राला उपायुक्त विजय देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त विनोद जाधव, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, उप अभियंता राजीव गौतम, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, नरेंद्र रामटेके, विनोद डोंगरे, रवी खोब्रागडे, जितेंद्र पौनीकर, आदी उपस्थित होते. तसेच इतवारी मिरची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!