सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 58 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 07) रोजी उपद्रव शोध पथकाने 58 प्रकरणांची नोंद करून 25 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 30 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत राईस असोसिएट्स श्रीराम अपार्टमेंट सुरेंद्र नगर कचरा रस्त्यालगत टाकल्याबाबत एकुण 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत स्टे ईन डोरमीटोरी रेल्वे स्थानक परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 2 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान

Sat Jun 8 , 2024
– प्लास्टिक उद्योगाने उत्कृष्टता जोपासत ‘ब्रँड इंडिया’ निर्माण करावा: राज्यपाल रमेश बैस – प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी मुंबई :- विसाव्या शतकात शोध लागलेली प्लास्टिक ही बहुगुणी वस्तू असून आज दैनंदिन जीवनापासून अनेक क्षेत्रांत प्लास्टिक अनिवार्य वस्तू झाली आहे. भारतीय प्लास्टिक उद्योगाने जगातील अनेक बाजारपेठा काबीज केल्या असून या उद्योगाने संशोधन, नावीन्यता व उत्कृष्टतेच्या माध्यमातून ‘ब्रँड इंडिया’ निर्माण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!