सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 56 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (08) रोजी शोध पथकाने 56 प्रकरणांची नोंद करून 75400 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 49000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धूवून परिसर अस्वच्छ करणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. चिकन सेटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविले अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून रु 4400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून रु 9000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुखा कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 5000 दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेडिओ विंगच्या अधिवेशनासाठी उर्दू विंग पाठिशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे मुफ्ती हारून नदवी यांची जळगाव कार्यालयाला भेट

Fri Jun 9 , 2023
जळगाव खानदेश :-  देशाच्या इतिहासात प्रथमच रेडिओतील पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिक येथे होत आहे. रविवार, ११ जून २०२३ रोजी होऊ घातलेल्या या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनाच्या तयारीला शुभेच्छा देण्यासाठी उर्दू विंगच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव खानदेश येथील कार्यालयाला भेट दिली. व्हॉईस ऑफ मीडियाच्या उर्दू विंगचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांनी रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख यांची भेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!