विदेशी बँकेत नौकरी लावून देतो या नावाने ५०,८५,०००/- रु. तसेच विदेशातून कर्ज मिळवून देतो म्हणुन एकूण ७२ लाख रु. ची फसवणुक करणाऱ्या आरोपीतांना आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर मार्फत कार्यवाही करून अटक

नागपूर :- सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत पुढील प्रमाणे आहे की, यातील नमूद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील नमूद फिर्यादी यांच्या मुलाला युरोप मधील सायप्रस कन्ट्री, येथील पाईंट बँक मध्ये प्रती महीना ६० हजार युएस डॉलर (४८ लाख रू.) पगाराची नोकरी लावून देतो असे आमीष दिले. त्यासाठी त्याने फिर्यादीचे व त्याचे पत्नी व मुलाचे पासपोर्ट मागीतले व काही फॉरमॅलीटी पुर्ण करणे आहे. याकरीता काही पैसे लागतील असे सांगीतले. त्यावरुन त्याच्या मागणीप्रामाणे वेळोवेळी फिर्यादीने एकुण ५०,८५,०००/- रू. आशिक अली याचे आय.सी.आय.सी.आय बँक, सानपाडा, नवी मुंबई येथील बँक खात्यात सदरची रक्कम टाकली.

त्यानंतर मुलाच्या नोकरीचे काय झाले असे यातील नमूद फिर्यादी यांनी आरोपी याला वारंवार विचारणा केली असता, फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली तसेच फिर्यादीचे पैसे सुध्दा परत दिले नाही. त्यामुळे फिर्यादीनी फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून १) पो.ठाणे, सिताबर्डी, नागपूर शहर येथे ४९६/२३ कलम ४१६४२०४६८, ४७१.१२०(ब), ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात यातील आरोपी नामे १) आशिकअली नाथानी मोहीयअली नाथानी वय ७३ वर्ष २) हसन अहमद शेख वय ६२ वर्ष दोन्ही रा. पनवेल, मुंबई येथून ताब्यात घेवून त्यांना रितसर अटक करण्यात आली तसेच त्यांची पोलीस कस्टडी रिमांड दि. ०८/०८/२०२३ रोजी पर्यंत घेण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

नमूद आरोपीत इसमाविरूध्द पो.स्टे. पाचपावली येथे सुध्दा अप.कं. ८७९ / २०२३ कलम ४२०, ४०६, ४४१६४६७, ४६८, ४७१ ३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील आरोपीतांनी फिर्यादी यांना RS Investment Bank & Trust चा चेअरमन असून त्यांना ३०० एकर या ऑरेंज फार्म खरेदी करायला नागपूरला आले आहे. तसेच “तुम्हाला मी कमी रेट ऑफ इन्टरेस्ट मध्ये सॉफ्ट लोन (Tax paid and free of any criminal activity fund) देवू शकतो. त्यांचे विदेशात पैसे आहेत. तसेच आरोपी हे त्यांचे विदेशातील पैसे सरळ कोणत्याही व्यवसायामध्ये गुंतवू शकत नाही. फिर्यादीला ते सॉफ्ट लोनच्या मार्फतीने फन्डींग करु शकतात.” असे म्हणून जवळीक साधुन आरोपीतांना फिर्यादीने सॉफ्ट लोनकरिता होकार दिल्याने सॉफ्ट लोन देण्याची हमी दिली. व फिर्यादीने आरोपीता सोबत सॉफ्ट लोन संदर्भात सॉफ्ट लोन करारनामा” तयार करून लोनची रक्कम ही RBI च्या मार्फतीने विदेशातून पैसे मागविण्याकरिता टॅक्सेशन लागत आहेत असे म्हणुन आरोपीतांना फिर्यादीने एकुण ७२ लाख रू. दिले व त्यानंतर आरोपीतांनी सदरचे सॉफ्ट लोन करीता ५०५ मिलीअन युएस डॉलरचे (८० कोटी भारत करंसी नुसार) असे १० मिलीअन डॉलरचे डी.डी. दिले. त्यावर RS INVESMENT BANK & TRUST, LEI असे बँकेचे नांव नमूद होते. परंतु सदरचे चेक युएसए ला क्लीअर होवू  शकले नाही. त्यावेळी फिर्यादीच्या लक्षात आले कि, नमूद आरोपीतांनी त्यांचे सोबत विश्वासघात करून एकूण ७२ लाख रु घेवून फसवणुक केली आहे.

आरोपी क्र.१ व २ हे स्वतःला उद्योगपती भासवून लोकांना फसवित असून त्यांच्यावर इतर राज्यात सुध्दा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. नमूद दोन्ही गुन्हयांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर मार्फतीने सुरू आहे.

याद्वारे लोकांना आव्हान करण्यात येत आहे की अशा प्रकारची नमुद आरोपीतानी कोणाची फसवणुक केली असल्यास आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथे संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गंभीर अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.

Tue Aug 8 , 2023
नागपूर :-  पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत भन्ते आनंद कौशल्या नगर पिवळी नदी जवळ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी विशाल सुभाष कोचे वय २३ वर्ष, यांचे वडील सुभाष कोचे वय ५२ वर्ष, हे सायकलने नाका नं. २ खसाळा गावा जवळ, दुर्गा माता मंदीर जवळील घाटे डेअरी जवळून जात असता. त्यांना २२ चाकी कंटेनर ट्रक क. एम.पी ६५ एच ०३७० चे चालकाने त्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com