गंभीर अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.

नागपूर :-  पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत भन्ते आनंद कौशल्या नगर पिवळी नदी जवळ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी विशाल सुभाष कोचे वय २३ वर्ष, यांचे वडील सुभाष कोचे वय ५२ वर्ष, हे सायकलने नाका नं. २ खसाळा गावा जवळ, दुर्गा माता मंदीर जवळील घाटे डेअरी जवळून जात असता. त्यांना २२ चाकी कंटेनर ट्रक क. एम.पी ६५ एच ०३७० चे चालकाने त्याने ताब्यातील कंटेनर ट्रक भरभाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडीलाचे सायकलला धडक देवून, त्यांचे डावे पायाला गंभीर जखमी करून पळून गेला, जख्मी यांना होप हॉस्पीटल येथे उपचारकामी भर्ती केले आहे उपचार सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे कपिलनगर येथे पोउपनि वारके यांनी कंटेनर ट्रक चालक आरोपीविरूध्द कलम २७९, ३३८ भादवि सहकलम १८४, १३४. १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

Tue Aug 8 , 2023
नरखेड :- दिनांक ०२/०८/२०२३ चे ०७:३० वा. ते दिनांक ०६/०८/२०२३ चे ११:०० वा. चे सुमारास पो.स्टे. नरखेड हद्दीतील फिर्यादीची मुलगी हि नेहमी प्रमाणे शाळेचा ड्रेस टाकुन क्रांती ज्योतीबा फुले नरखेड येथे शिकते. म्हणून शाळेत गेली त्या दिवशी पाणीच पाणी असल्याने व कामधदा नसल्याने फिर्यादीच्या घरचे सर्वजण घरीच हजर होते. मुलगी ही नेहमी प्रमाणे ०५.०० वा. घरी येते परंतु रात्री ०८.०० […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com