नागपूर :- प्रधान मंत्री टि.बी. मुक्त भारत योजने अंतर्गत पूर्व नागपूर म.न.पा. दवाखान्यामध्ये ज्या टि.बी. पेशंटचे उपचार सुरु आहे. अश्या सर्व 500 पेशंटला दरमहा पौष्टिक आहार किट देऊन त्यांचे स्वास्थ चांगले होण्याची कामना करून या 500 लोकांना दत्तक घेऊन दरमहा पौष्टिक आहार किट त्यांचा घरापर्यंत किंवा दवाखान्याचा माध्यमातून मिळेल सहा (6) महिन्यापर्यंत या रोग्यांना हि किट मिळणार आहे. याला लागणारा निधी आमदार निधी मधून खर्च करण्यात येत असून याला शासनाने मान्यता दिलेली आहे.
यात पहिल्या टप्याचे वाटप नितीन गडकरी यांचा वाढदिवसाचा निमित्याने करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने टि.बी. रोग्यांनी या पौष्टिक आहार किट चा लाभ घेतला.