– जन आशीर्वाद यात्रेद्वारे पिंजून काढले मध्य नागपूर
नागपूर :- आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. मात्र शासकीय नोकऱ्यांमध्ये बरोबरचा वाटा दिल्या जात नाही. यासाठी प्रत्येक शासकीय नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्यास महिलांना समान संधी मिळेल. यासोबत महागाईमुळे प्रत्येक गृहीणीचे बजेट कोलमडले आहे. त्यांना स्वयंपाक करणेही कठीण झाले आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या खात्यात वार्षित एक लाख रुपये देण्यात येईल, असा विश्वास काँग्रेसच्या पाच न्यायापैकी महिला न्यायमध्ये दिला असून त्याची अंमलबजावणी आम्ही करणार असल्याची ग्वाही इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी दिली. महागाईमुळे चिडलेल्या महिलांनी जन आशीर्वाद यात्रेत आमच्यासाठी तुम्ही काय करणार म्हणून प्रश्न विचारला तेव्हा ठाकरे बोलत होते.
मंगळवारी मध्ये नागपूरात दोसर भवन चौक येथून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर शहिद स्मारक मेट्रो स्टेशन-भोईपुरा-गांधी चौक-फायर ब्रिगेड ऑफिस-मॉडेल मिल-तुळशिबाग-दसरा रोड-बडकस चौक-सेवासदन चौक-तकिया-कसाबपुरा-एमएलए कॅटिंग मार्गे फरहिन हॉटेलजवळ रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री अनिल अहमद, अतुल कोटेचा, बंटी शेळके, अँड. नंदा पराते, आसिफ कुरैशी, दिपक पटेल, वसिम खान यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर दिवसभर विविध प्रतिष्ठित सामाजिक संघटना आंदीसोबत बैठकीनंतर सायंकाळी सात पासून आठ सभांचे आय़ोजन करण्यात आले होते. सर्व सभांमध्ये मोठ्यासंख्येत नागरिकांची उपस्थिती होती.