कामठी रहिवासी सफाई कर्मचाऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 24;-नागपूर शहर अंतर्गत येणाऱ्या टेका नका परिसरातील अन्न धान्य वितरण कार्यालयात मागील 20वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने सदर पदावर स्थायी नियुक्ती व वेतन वृद्धी करण्यात यावी यासाठी संबंधित विभागाकडे मागणीचा एकच सपाटा लावला होता मात्र या मागणीला केराची टोपली दाखवत अक्षम्य दुर्लक्ष पुरविण्यात येत होते यावर आपल्या न्यायिक हक्काचो मागणी पूर्ण करण्यासाठी सदर सफाई कर्मचाऱ्याने कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता.यानुसार सदर सफाई कर्मचाऱ्याने आज 24 मार्च ला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली मात्र वेळीच पोलिसांनी सावधतेचा पवित्रा घेत सदर इसमास आत्महत्या करण्यापासून थांबविल्याने एक मोठा अनर्थ ठरला.आत्महत्या चा प्रयत्न करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्याचे नाव विनोद मेहरोलिया रा येरखेडा कामठी असे आहे.
जीवनाचे वीस वर्षे नोकरी ही मानधन स्वरूपात मिळणारी पगार ही स्थायी नियुक्तीची होईल व वेतनवाढ होईल या आशेतच कार्यरत राहले तेव्हा सरतेशेवटी आतातरी स्थायी नियुक्ती देऊन वेतन वृद्धी करावो यासाठी कंटाळून सफाई कर्मचारी विनोद मेहरोलिया यांनी आत्महत्येचा पवित्रा स्वीकारला मात्र वेळीच पोलीस धावल्याने अनर्थ टळला.पोलोसानी सदर इसमास ताब्यात घेतले असून पुढोल कारवाही सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

The Kashmir Files पर केजरीवाल बोले- विवेक अग्निहोत्री यूट्यूब पर डाल दें, फिल्म फ्री हो जाएगी

Fri Mar 25 , 2022
नई दिल्ली – दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने The Kashmir Files को लेकर प्रतिक्रिया दी है. विधानसभा के बजट सत्र के दौरान अरविंद केजरीवाल ने कहा कि बीजेपी के लोग मांग कर रहे हैं कि फिल्म को टैक्स फ्री कर दिया जाए.   दिल्ली के सीएम केजरीवाल ने कहा – “टैक्स फ्री क्यों करा रहे हो. इतना ही शौक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights