नागपूर :- पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत, उन्नती मोटर्स, महेंद्रा चारचाकी वाहनाचे शो-रुम, जुनी कामठी येथे अज्ञात आरोपींनी शो-रूमचे मागचे बाजुने लपुन येवुन शो-रूमचे सेक्युरीटी गार्ड यांना मारहान केली व त्यांना जखमी करून बांधुन ठेवले, शो-रूम चे कॅश काऊंटर मधील लोखंडी कपाट कटरचे सहायाने कापुन लोखंडी कपाटातील ६,०४,२५३/-रु. जबरीने चोरून घेवुन गेले होते. फिर्यादी शशीकुमार नर्मदाप्रसाद शेडे, वय ५२ वर्षे, रा. प्लॉट नं. ९९, सेवादल नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपुर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जुनी कामठी येणे अज्ञात दोन ते तिन आरोपीविरूध्द कलम ३९४, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, तसेच तांत्रीक तपास करून उन्नती मीटर्स येथील कर्मचारी १) मोहम्मद रिवाज वल्द गुलाब खान, वय २५ वर्षे, रा. गिता नगर, झिंगाबाई टाकळी, नागपुर २) मोहम्मद सोहेल वल्द असद अयुब खान, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १. प्रकाश नगर, आदीवासी सोसायटी, गोधनी रोड, नागपुर यांची गुन्हेशाखा येथे बोलावुन सखोल विचारपुस केली असता, नमुद दोन्ही आरोपी यांनी वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन रोख २,३६,०६०/-रू. व चोरीचे पैशाने खरेदी केलेले दोन मोबाईल, एक कटर मशीन, होंडा एसपी-१२५ दुचाकी, तसेच गुन्ड्यात वापरलेली हिरो होंडा पेंशन प्रो क. एम. एच. ३१ सि.झेड. ५२४२ व एक मोबाईल फोन असा एकुण ४,९१,०६०/-रू. चा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना मुद्देमालासह जुनी कामठी पोलीसाचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस सह आयुक्त, नागपूर शहर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा), पोनि. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शखाली, पोउपनि अनिल इंगोल, पोहवा दिपक रिठे, विलास कोकाटे, प्रदीप पवार, मनिष बुरडे, नापीअं. अजय शुक्ला, संतोष गुप्ता, सचिन तुमसरे, पोर्भ कपिलकुमार तांडेकर, अभय ढोणे तसेच, सायबर टिमचे पोउपनि झिंगरे व त्यांची टिम यांनी केली.