सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 49 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (26) रोजी शोध पथकाने 49 प्रकरणांची नोंद करून 38,800/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 19,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत मे. राज स्वीट मार्ट यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. गुप्ता नमकीन यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. हाय ट्रेक ट्युशन क्लासेस यांनी मनपा विरूध्द विनापरवानगीशिवाय विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. ब्लीस वन अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 Lakh Maha Cards Sold!

Wed Nov 27 , 2024
*MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED* (Nagpur Metro Rail Project) • Another Feather in Nagpur Metro’s Cap • Digital Payment Gets Boost with Maha Card NAGPUR :- Maha Metro has always promoted use of digital means for fare payment. It has provided a number of options including mobile app and Maha Card for such means. Maha Card is being extensively bought […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com