मे. जगदंबा ओव्हरसीजला 5 हजाराचा दंड
नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज मे. जगदंबा ओव्हरसीज, प्लाट नं.11, खसरा नं.22, अमरावती रोड, हिरणवार ले-आऊट, वाडी, नागपूर-23 येथील गोडावूनमध्ये आकस्मीकपणे प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर गोडावून परिसरात 479 किलोग्रॅम प्रतिबंधित प्लास्टीक खर्रा पन्नी साठवलेली आढळून आली असून मंडळामार्फत 479 किलोग्रॅम खर्रा पन्नी जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर गोडावूनवर प्राथमिक गुन्हा दंड 5 हजार रूपये आकारणी करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसी हिंगणा येथील 5 उद्योगावर कारवाई करून 1.5 टन प्रतिबंधित प्लास्टीक 6 जुलै रोजी जप्त केलेले आहे.
राज्यात 23 मार्च 2018 पासुन प्लास्टीक पिशव्या व नॉन ओवन प्लास्टीक पिशव्यांचा वापर प्रतिबंधीत करण्यात आलेला आहे. त्यानंतर केन्द्र शासनाच्या 12 ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे 1 जुलै 2022 पासून एकल प्लास्टीकचे उत्पादन, वापर, साठवणूक, वाहतूक व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधीत एकल प्लास्टीकची विक्री, वाहतूक, साठवणूक, वापर व उत्पादन केल्यास प्रथम दंड 5हजार रूपये, द्वितीय दंड 10 हजार रूपये व तृतीय दंड. 25 हजार रुपये त्याचबरोबर तीन महिन्याची कैद ही तरतूद आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पथकात क्षेत्र अधिकारी, मनोज वाटाणे उप-प्रादेशिक अधिकारी नागपूर-2 आनंद काटोले व प्रादेशिक अधिकारी अशोक करे यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात आली.