काळतोंड्या दुर्मिळ सापाला दिले सर्प मित्राने जीवनदान

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील येडमाकोट या गावामध्ये पवन बरवेकर यांच्या घरी 16 नोव्हेंबर एक दुर्मिळ साप आढळून आला .या सापाला सर्पमित्र विकास तिडके याने पकडले. या सर्पाबददल सर्पमित्राने अशी माहिती दिले आहे की साप काळतोंड्या (Black headed snake) असुन हा साप बिन विषारी आहे. हा साप पोवळा या विषारी सापा सारखा दिसतो,या सापाचे शरीर तांबुश तपकीरी रंगाचे असुन सरीरावर तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराच्या पृष्ठभागावर मध्यभागी लहान काळे ठिपके असतात, तोंड काळे असल्यामुळे मराठी त्याचे नाव काळतोंड्या असे पडले आहे. याची सरासरी लांबी २० सेमी ते जास्तीत जास्त 80 सेमी असू शकते. तसेच दोन्ही बाजूंना तोंडापासुन शेपटीपर्यंत लहान छिद्रे असतात. या सापाला कृष्णशीर्ष सर्प देखील बोलले जाते. या प्रकारचा दुर्मिळ साप या परिसरात पहिल्यांदाच दिसून आलेला आहे. सर्प मित्र विकास तिडके यांने सापाला पकडून जंगलात सोडून दिले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Thu Nov 17 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.16) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 11 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com