आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या – परिवहन मंत्री अनिल परब

दि.६ ते १४ जुलै २०२२ दरम्यान धावणार गाड्या वाखरी येथील रिंगण सोहोळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध 

 मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

 

            मंत्री परब म्हणालेदिनांक  ६ ते १४ जुलै२०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी दि.८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईपुणेनाशिकऔरंगाबादनागपूरअमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही  परब यांनी केले.

            गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एस टी महामंडळावर आहे. त्याकरिता या गाड्या सोडण्यात येणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.

विशेष गाड्यांचे नियोजन

            यात्रेसाठी औरंगाबाद – १२००मुंबई – ५००नागपूर – १००पुणे – १२००नाशिक – १००० तर अमरावती ये थून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

            पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरीभाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागाभिमापांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यानयात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणीसुलभ शौचालयसंगणकीय आरक्षण केंद्रचौकशी कक्षमार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अधिकाधिक भाविक-प्रवाशांनीएसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बसस्थानकांचे नियोजन

            पंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

बस स्थानक आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसखालील प्रमाणे

१. चंद्रभागा बसस्थानक    –   मुंबईठाणेरायगडसातारापुणे विभाग व पंढरपूर आगार

२. भिमा यात्रा देगाव       –   औरंगाबादनागपूर व अमरावती प्रदेश

३. विठ्ठल कारखाना        –    नाशिकजळगावधुळेअहमदनगर

४. पांडुरंग बसस्थानक     –   सांगलीकोल्हापूररत्नागिरी व सिंधुदुर्ग

            याप्रमाणे बस सेवासुरू करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Thu Jun 16 , 2022
अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक             मुंबई :- जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास  विभागासह विविध विभागांच्या माध्यमातून पावले उचलण्यात येत असून जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.                जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!