संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेती,प्लॉट अशा स्थावर मालमत्तेचे भाव गगनाला भिडू लागले आहेत त्यामुळे मालमत्ता घेणारे ही मालमत्ता मोजणी करूनच घेणे पसंत करू लागले आहेत.कामठी तालुक्यातील भूमी अभिलेख विभागात तब्बल 430 च्या जवळपास मोजणीसाठीचे अर्ज पेंडिंग असल्याचे सांगण्यात आले.विशेष म्हणजे यामध्ये तातडीची, अति तातडीची ,अति-अति तातडीची नियमित अशा प्रकारे मोजणीसाठी अर्ज केले आहेत.
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रापर्टीच्या व्यवसायाला गती आली आहे.प्रामुख्याने जो तो शेती-प्लॉट यामध्ये गुंतवणूक करू लागला आहे.परिणामी अव्वा चे सव्वा भाव शेती व प्लॉट चे झाले आहेत.या भावामुळे शेती व प्लॉट कमी भरू नये यासाठी खरिददार सदर प्लॉट व शेतीची मोजणी करूनच खरेदी करून घेत असल्याचे पुढे आले आहे त्यामुळे व्यवहार झाल्यानंतर तुम्ही शेती प्लॉट मोजणी करून आणल्यावर खरेदी करू असा या व्यवहारातील करार असतो.
त्या करारानुसार शेती,प्लॉट विक्री करणारे मोजणीसाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करतात. मोजणीसाठी अर्ज करताना मोजणी कशाप्रकारे हवी आहे अशी तरतूद यामध्ये आहे.कारण एक गुंठा ते दोन हेक्टर पर्यंत 2 हजार रुपये अती तातडीच्या मोजणीसाठी मोजावे लागतात जर अती तातडीची मोजणी साठी 3 हजार रुपये आणि अति अति तातडीच्या मोजणीसाठी 12 हजार रुपये असा शुल्क आकाराला जातो.तातडीची मोजणी 3 महिन्याच्या आत ,अति तातडीची मोजनि 2 महिण्याच्या आत आणि अति अती तातडीची मोजनी 21 दिवसाने केल्या जाते.अर्ज केल्यावर हा कालावधी ठरतो .नियमित मोजणी ही सहा महिन्यांच्या आत केल्या जाते .तर दर महिन्याला वेगवेगळे प्रकारातील 150 च्या जवळपास मोजणी साठी अर्ज येत असतात मात्र सद्यस्थितीत 430 मोजणी चे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत.
-मोजणी लांबविण्यासाठी असाही फंडा!
-मोजणी लांबविण्यासाठी अनेक प्रॉपर्टी व्यावसायिक फंडे वापरतात. जसे की प्लॉट किंवा जमीन व्यवहारात सौदा चिट्ठीत मोजणीची अट लिहिल्या जाते.मोजणी करून दिल्या नंतरच खरेदी केल्या जाईल असे प्रॉपर्टी व्यवसायिक म्हणतात .शेती विक्री करणारा ही अट मान्य करतो व आपल्या शेती किंवा प्लॉटची 11 किंवा 8 महिन्याच्या आत मोजणी करून देतो नंतर खरेदी करू अशा अटी मान्य करून तातडीची अति तातडीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेतात परंतु प्रॉपर्टी व्यवसायिक भूमी अभिलेख च्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्यांना अर्थपूर्ण रित्या ही मोजणी लांबविन्यात यशस्वी सुद्धा करून घेतात यामध्ये या व्यवहाराला अधिकचा कालावधी मिळून त्यांना व्याजाचा व वाढत्या दराचा दुहेरी फायदा होतो.