– एनईटीएफ, एनबीए या संस्थाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित
नागपूर :- नागपूरच्या बुटोबोरीजवळ वारंगास्थित भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान, -ट्रिपल आयटी, नागपूर येथे 21 ऑक्टोबर शनिवार, रोजी तिसरा दीक्षांत समारंभ वारंगा कॅम्पस येथे सकाळी 11 वाजता आयोजित केला असून या दीक्षांत समारंभाला, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम ( एनईटीएफ), नॅशनल बोर्ड ऑफ- एक्रीडेशन (एनबीए) या संस्थाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ट्रिपल आयटी नागपूरचे संचालक डॉ . ओ . जी . काकडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी संस्थेचे कुलसचिव कैलास डाखले उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभाप्रसंगी एकूण 324 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून यात 5 पीएचडीचे विद्यार्थी ,10 एमटेकचे विद्यार्थी ,197 संगणक विज्ञान अभियांत्रिकी -सीएसई आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पुटर इंजिनिअरिंग – ईसीई चे विद्यार्थी ,इंफार्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी -आयसीटीमध्ये 112 पदव्युत्तर पदविकेचे विद्यार्थी यांचा समावेश आहे .ट्रिपल आयटीतर्फे सीएसई आणि ईसीई अभ्यासक्रमात उल्लेखनीय काममिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनांही यावेळी पुरस्कार प्रदान केले जातील .सीएसई अभ्यासक्रमाचे अमन वर्मा यांना तर ईसीई अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पवन कुमार यांना उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल मानपत्र आणि रोख राशी प्रदान केल्या जाणार आहे.
ट्रिपल आयटी नागपूर कॅम्पसमध्ये 2023 च्या बॅचसाठी 166 कंपन्यांनी भेट दिली आहे आणि 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या बॅचसाठी नोकरीचे वार्षिक पॅकेज 90 लाख रुपये आणि सरासरी वार्षिक पॅकेज 14 लाख रुपये इतके आहे.
या संस्थेमध्ये-बी.टेक सीएसई (ह्यूमन कंप्यूटर इंटरेक्शन एंड गेमिंग टेक्नोलॉजी)बी; टेक सीएसई (डेटा साइंस एंड एनालिटिक्स) बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स एवं संचार इंजीनियरिंग) -बीटेक ईसीई (इंटरनेट ऑफ थिंग्स) या 4 नव्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला असून मिलिट्री कॉलेज ऑफ टेली कम्युनिकेशन या मध्य प्रदेशच्या ‘मिल्ट्री हेडकॉर्टर ऑफ वार – महू’ येथील संस्थेच्या लष्करी अधिकाऱ्यांना साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमही ट्रीपल आयटी संस्थेव्दारे चालवला जात आहे . वित्तीय संस्था , आरबीआय येथील अधिका-यांनाही प्रादेशिक भाषामध्ये वित्तीय सुरक्षा अशा घटकावर प्रशिक्षण ट्रिपल आयटीद्वारे दिले जाते. सध्या ट्रिपल आयटी नागपूर कॅम्पसमध्ये विविध अभ्यासक्रमाचे 2,026 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती संचालक डॉ. ओ. जी. काकडे यांनी दिली.