
नागपूर : पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृती दिननिमित्त समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी दीक्षाभूमी परिसरात त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन आदरांजली वाहिली. त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर उपस्थित होते.यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिवादन केले.
