संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील मराठा दरबार हॉटेल समोर एका संशयित तरुणाच्या पिशवीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 6 हजार 640 रुपये किमतीचा 332 ग्राम जप्त करण्यात आला तसेच एक दुचाकी व एक मोबाईल असा एकूण 27 हजार 640 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव मो शाबीर मो जागिर वय 26 वर्षे रा कादर झेंडा कामठी असे आहे.