संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21:-मागिल काही दिवसापासून कामठी शहरात घरफोडीचे प्रमाण वाढीवर असून चोरट्यानी चोरीचे धाडसत्रच राबविले आहेत त्यातच पोलिसाना येत असलेल्या अपयशामुळे पोलिसांचा गुन्हेगारीवर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे .पोलिसांच्या याच अभयपणामुळे चोरट्यानी एक पाऊल पुढे करीत कमसरी बाजार परिसरातील एका घरात अवैधरित्या शिरून घरात सुरक्षित ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी 37 हजार रुपये असा एकूण 3 लक्ष 45 हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना गतरात्री साडे बारा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित घरमालक फिर्यादी प्रीती अमोल वाघमारे वय 36 वर्षे रा.कमसरी बाजार कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे उपरोक्त नमूद घटनास्थळी रहिवासी असून कुटुंबासह वरच्या माळ्यात झोपले असता खालच्या माळ्यात वृद्ध आई वडील झोपले होते .सदर घटना वेळी अज्ञात चोरट्याने घरी सर्व मंडळी झोपी असल्याचे संधी साधुन घरात अवैधरित्या प्रवेश करून खालच्या माळ्यात असलेल्या बेडरूम मधील लोखंडी आलमारीत सुरक्षित ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी 37 हजार रुपये असा एकूण 3 लक्ष 45 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कमसरी बाजार परिसरात 3 लक्ष 45 हजार रुपयांची घरफोडी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com