महिला सह २९ रक्तदात्यानी केले रक्तदान..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु उद्देशीय संस्था टेकाडी द्वारे संचालित राजे फाउंडेशन व दिनेश चिमोटे मित्र परिवार व्दारे आयोजित रक्तदान शिबिरात २९ रक्तदात्यानी रक्तदान केले.

टेकडी येथे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी द्वारे संचालित राजे फाउंडेशन व दिनेश चिमोटे मित्र परिवार यांच्या पुढा काराने लाईफ लाईन ब्लड बँक च्या सहकार्याने आयो जित रक्तदान शिबीरास स्वयंफुर्त लोकांचा प्रतिसाद मिळाला. शिबिरात लक्ष्मीकांता पंकज मोहाडे, रेश्मा रवि मोहाडे दोन महिला व २७ पुरू़ष असे एकुण २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरात रक्तदान कर ण्यास अनेक महिलांनी इच्छा दर्शवली परंतु वेगवेग ळ्या कारणास्तव त्याना रक्तदान करता आले नाही . महिलाच्या या पुढाकाराने आनंद व्यकत करण्यात आला. या रक्तदान शिबिराला गावातील नागरिकांनी तसेच अनेक संघटनाने उपस्थिती दर्शविली. रक्तदान शिबिराचे आयोजन दिनेश चिमोटे यांच्या वाढदिवसा निमित्त करण्यात आले होते. शिबिरांच्या यशस्विते करिता सुरेश मोहाडे, गणेश मस्के, मनोज लेकुरवाडे, प्रविण चव्हाण, किशोर गाडगे, देवेंद्र वासाडे, मनोज गुळधे, पंकज मोहाडे, निलेश राऊत, पूर्वेश निमकर, प्रमोद मोरे, अभिजीत कुरडकर, अतुल कोरडकर, अक्षय बोबडे, प्रशांत टाकळखेडे, चंद्रप्रकाश नागतोडे, सचिन चीमोटे, सचिन ढोबळे आदी ग्रामस्थ आणि गुरुकृपा आखाडा टेकाडी, थोर पुरुष विचार मंच टेकडी, युवा सामाजिक संघटन टेकाडी आदीने विशेष सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजपा आदिवासी आघाडीतर्फे गोंड राजे बख्त बुलंदशहा यांना जयंती निमित्य अभिवादन.

Sun Jul 30 , 2023
नागपूर – भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपुर शहर तर्फे नागपूर नगरी संस्थापक गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले. गोंड राजे बख्त बुलंदशहा यांनी नागपुरची स्थापना जवळ जवळ ३२१ वर्षांपूर्वी सन १७०२ मध्ये यांनी प्रथम केली होती. बख्त बुलंद शाह देवगढ़ येथून नागपुरला आले अणि येथील १२ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com