अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी येथे आज दिनांक 28/11/2022 रोजी महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृति दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. जी. आंबिलकर यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. आंबिलकर व प्रमुख अतिथी म्हणून एच. जी. तुरक सहाय्यक शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेतील.ता शिक्षक केतन खाेब्रागडे ,पंकज रहांगडाले, सविता सार्व, पुष्पलता धांडे, इत्यादी शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. जी. आंबिलकर, यांनी अध्यक्षीय भाषण करतांना “महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढुन स्त्री यासाठी शिक्षणासाठी दारे खुली केली तसेच स्त्री शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दलचे महत्व आपल्या भाषनात विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काेमल गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन पेहर जनबंधु यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.