विधानसभेच्या जागा 288, राष्ट्रवादीचं ‘मिशन 100’; काँग्रेस, ठाकरे गटाचं मिशन काय? 

शिर्डी :- राष्ट्रवादीचं दोन दिवसाचं मंथन शिबीर शिर्डीत पार पडलं. रुग्णालयात असूनही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  या बैठकीला हजर राहिले. तर वैयक्तिक कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या शिबिराला हजर न राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या शिबिरातून राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे संकेत दिले असून राष्ट्रवादीने मिशन 100चा नारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या नाऱ्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीने 100 जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. मग महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट किती जागा लढवणार? अशी चर्चा आता या निमित्ताने रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डीच्या शिबिरातून विधानसभेसाठी मिशन 100चा नारा दिला आहे. मिशन 100 ची घोषणा आम्ही केलेली आहे. आमच्या पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न करू. जेवढे निवडून येऊ शकतात त्या सर्वांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू, असं जयंत पाटील म्हणाले.

मध्यावधी निवडणुकांबाबत म्हणाल तर सध्याची जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणं अजून अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या राज्यात अस्थिर परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे, असं ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबा नागार्जुन को किया याद

Sun Nov 6 , 2022
सावनेर :-  स्थानीय अरविंद इंडो पब्लिक स्कूल हेती (सुरला)ने बड़ी सादगी से प्रसिद्ध कवि, लेखक, समाज सुधारक, जनकवि बाबा नागार्जुन को उनकी पुण्यतिथि पर दी श्रद्धांजलि कार्यक्रम का शुभारंभ बाबा नागार्जुन की प्रतिमा पर माल्यार्पण कर दीप प्रज्वलन से हुआ।  स्मिता अटालकर, रंजना ठाकुर , हेमा जोध एवं प्रणाली हिवरे की प्रमुख उपस्थिति में विद्यार्थियों ने बाबा नागार्जुन की कविताओं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com