नागपूर विद्यापीठात क्रांतीज्योती स्मृतीदिन संपन्न 

क्रांतीज्योती च्या काळातील अत्याचाराचे स्वरूप बदलले : डॉ नीरज बोधी 

नागपूर :-स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळातील स्त्री-पुरुष अत्याचाराचे स्वरूप बदलले परंतु अजूनही शूद्र अतीशुद्रावर आजही त्याच प्रकारचे अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने क्रांतीज्योती सारखे प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात खंबीरपणे उभे रहावे. असे आवाहन पाली पाकृत व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ. नीरज बोधी यांनी केले.

प्रा डॉ नीरज बोधी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाली-पाकृत व बौद्ध अध्ययन विभागात झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 126 व्या स्मृतिदिन समारोहाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने प्रा डॉ तुळसा डोंगरे, प्रा पुष्पा ढाबरे, डॉ रोमा शिंगाडे, प्रा सरोज वाणी, डॉ ज्वाला डोहाने, प्रा रेखा बडोले, प्रा डॉ सुजित वनकर मंचावर उपस्थित होते.

यावेळी प्रीती रामटेके, सिद्धार्थ फोपरे, दिशा वानखेडे, अरुण पाटील, रंजना वनकर, सुरेंद्र पगारे, अन्नपूर्णा गजभिये, चंदा बुरबुरे आदी विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम शेवडे यांनी, संचालन राणी फुलझेले यांनी तर समापन अलका जारुंडे यांनी केला.

Email Us for News or Artical - dine[email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com