पारशिवनी :- पोस्टे पारशिवनी येथे दाखल अप. क्र. ११९ / २०२३ कलम ४२० भादवी सहकलम 66 (C) (D) आय टी अॅक्ट मध्ये दाखल गुन्हयात यातील फिर्यादी याने त्यांचे ब्लॉक झालेले ए. टी. एम. कार्ड सुरू करण्यासाठी गुगलवर एस बी आय कस्टमर केअर नंबरचा शोध घेतला असता त्याद्वारे प्राप्त अनोळखी व्यक्तीने लगेच त्याचे मोबाईलवर फोन केला व फिर्यादीने वॉटसअॅपवर लिंक पाठविली व Rustdesk o customer support हे दोन अॅप डाउनलोड करायला लावून प्रथम त्याने फिर्यादीस गुगल द्वारे १०/- रू पाठवायचे सांगुन फॉडरने त्याचा युपीआय पिन प्राप्त करून फिर्यादीच्या मोबाईलचा अॅक्सेस स्वतः कडे घेवुन फिर्यादीस काही कळायच्या आतच त्याचे खात्यामधील एकुण 2,75,000/- रूपये काढुन फिर्यादीची ऑनलाईन फसवणुक केली होती…. सदर गुन्हयात पो.स्टे पारशिवनी प्राप्त पत्रान्वये सायबर पोलीस स्टेशनकडून विविध तांत्रीक पैलूचा तपास करून पुरावे गोळा केले व १५ दिवसाचे आत आरोपीचा शोध घेवून पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये पो.स्टे. सायबर व पो.स्टे. पारशिवनी यांची टीम तयार करून तेलंगणा येथे रवाना करून आरोपी निरजकुमार पासवान यास मेडल हैद्राबाद, तेलंगाणा येथुन अटक करण्यात आली.
सदर कामगीरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक श्री. डॉ. संदीप पखाले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक आशित कावळे यांचे मार्गदर्शनात पो. नि. राहुल सोनवने पो.स्टे पारशिवनी, सायबर पो.स्टे. पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर तसेच पोहवा संदीप कडु, पोहवा स्नेहलता ढवळे, पोना वर्षा खंडाईत, संगीता गावडे, सतीश राठोड पोशि राकेश बन्नाटे, मृणाल राऊत यांनी पार पाडली.