अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक

– पोलीस स्टेशन भिवापूर ची कारवाई

भिवापूर :-दिनांक २५/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम आपले टिप्पर वाहन १० चाकी क्र. एम. एच. ४० / बी. एल. ३३७४ ने ब्रम्हपुरी कडुन विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक करीत भिवापूर मार्गे नागपूरकडे जाणार आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ नमुद घटनास्थळी गेले असता पोलीस स्टेशन टी पॉईंट राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५९(डी) येथे नाकाबंदी केली असता, घटनास्थळावर निलज फाट्याकडुन टिप्पर वाहन १० चाकी क्र. एम. एच. ४० / बी. एल.- ३३७४ येतांना दिसले, टिप्परच्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात चालक आरोपी नामे- प्रशात बाबुराव मेश्राम रा. सुरगाव पाचगाव भिवापुर हा रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर वाहन १० चाकी क्र. एम. एच. ४० / वी. एल. ३३७४ किंमती २०,००,०००/- रूपये मध्ये असलेली अंदाजे ०६ ब्रास रेती किंमती अंदाजे ३०,०००/- रू. वाहनासह असा एकूण किंमती अंदाजे २०,३०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी सरकारतर्फे पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक जयपाल सिंह गिरासे यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा / ९२४ प्रविन जाधव  हे करीत आहे. सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात, पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे, पोलीस हवालदार राकेश त्रिपाठी, प्रफुल माहुरे यांनी केली..

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com