24 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव -2022 बास्केटबॉल स्पर्धेकरीता महिला व पुरुष संघ घोषित

अमरावती :-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे 3 ते 07 डिसेंबर दरम्यान होणा-या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मिट क्रीडा महोत्सव -2022 बास्केटबॉल स्पर्धेकरीता महिला व पुरुष संघ घोषित झाला असून या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 20 ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे.

पुरुष संघ (बास्केटबॉल)

खेळाडूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा अभिषेक जवंजाळ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा दिनेश कठारे व पौझुमार्टीन नादंग, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजारचा रितेश कांबळे व यश मेंडके, भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा सागर गुजर, नेहरू महाविद्यालय, नेर परसोपंतचा महेश लाखे, श्री के.एन.गोयनका महाविद्यालय, कारंजा लाडचा निरज लाहोरे, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा प्रथमेश घरडे, ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा प्रज्वल पिडेकर व प्रज्वल लकडे, एम.एस. पाटील महाविद्यालय, मानोराचा अभय महाजन, एस.एस.एस.के.आर. इन्नानी महाविद्यालय, कारंजा लाडचा सौरभ वाहुरवाघ, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा सौरह धोटे, बी.एन. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसदचा मित आडे, भास्करराव शिंगणे महाविद्यालय, खामगावचा शुभम झाकर्डे याचा समावेश आहे.

महिला संघ (बास्केटबॉल)

महिला खेळाडूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कल्याणी दातीर, वंशिका बनकर,  सोनाली मोहतो व लोविती चिशी, पी.जी.टी.डी. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची अदिती काळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची  माधुरी सासनकर, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची श्रेया गणेशकर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची वैष्णवी यादव व  साक्षी अरोकार, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची जान्हवी केसले, इंदिरा महाविद्यालय, कळंबची  धनश्री वावरे, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजारची नेहा पुनवाटकर, एस.के.एन. गोयनका महाविद्यालय, कारंजा लाडची निलोफर भुरवटे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची  रुतुजा चांदीकर, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची समृध्दी डहाके, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची यामिनी अर्डक हिचा समावेश आहे.

सर्व खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आद्यक्रांतिगुरू लहूजी सालवे इनका जयंती समारोह हर्षोल्लास में मनाया

Tue Nov 15 , 2022
नागपूर : लहूजी सालवे स्मारक ट्रस्ट की ओर से भारत देश के आद्यक्रांतिगुरू लहूजी सालवे इनकी २२८ वी जयंती समारोह लहूजी सालवे उद्यान अंबाझरी यहॉ पर हर्षोल्लास से मनायी गयी! कार्यक्रम की अध्यक्षता ट्रस्ट के अध्यक्ष विनायक इंगोले इन्होने की! कार्यक्रम के उद्घाटक बहुजन विचारमंच के संयोजक नरेंद्र जिचकार इनके हाथो से दिप प्रज्वलित कर उद्घाटन हुआ! मुख्य अतिथी के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!