नुकसान टाळण्यासाठी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवणे आवश्यक महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

नागपूर :- वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना आटोस्वीच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टाळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना आटोस्वीच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रत्येक कृषिपंपांना क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटर मुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होते. कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविणे बंधनकारक आहे. सर्व विभागीय अधिकाऱ्यांना याविषयी जनजागृती करण्यासंदर्भात महावितरणकडून सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीज पंपाला कॅपॅसिटर बसवल्याने पंप जळण्याचे प्रकार थांबतात सोबतच रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाणही कमी होऊन शेतक-यांचे नुकसान होत नाही. कॅपॅसिटर च्या वापरा अभावी, नोंदणीकृत भारापेक्षा अधिक विद्युत भाराचा वापर होतो, रोहित्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक वीज वापरली गेल्यास रोहित्र नादुरुस्त चे प्रमान वाढते. नादुरुस्त होणाऱ्या रोहित्राच्या दुरुस्तीचा खर्च, वाहतुक आणि मजुरीचा खर्च शिवाय, रोहीत्र दुरुस्ती प्रक्रियेत अनेक दिवस वाया जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी निर्माण होऊन त्यात शेतकन्यांचे नुकसान होते. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. कृषिपंपाच्या क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे गरजेचे असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

NewsToday24x7

Next Post

स्नेक बाईट पेशंट 72 तासापासून बेशुद्ध

Wed Nov 29 , 2023
नागपूर :- अविनाश रंगारी कॉलेजचा विद्यार्थी (वय 18) राहणार हुडपा तहसील कुही, जिल्हा नागपूर ह्याला 25 नोव्हेंबर ला सकाळी 11.30 च्या सुमारास शेतात गेला अस्तांना चवऱ्या मायडूर ह्या विष्यारी सापाने 2 वेळा चावा घेतला. त्याला नागपूर मेडिकल येथे वार्ड नंबर 52 आयसीयू मध्ये त्याच दिवशी दुपारी 1 वाजता ऍडमिट केले आहे. त्याला 72 घंटे होऊन अजून पर्यंत प्रॉपर आराम झालेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com