कान्होलीबारा येथे 15 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, भारतात पहिल्यांदाच स्थापना

नागपूर :- स्कंध पुराणात वर्णित श्री क्षेत्र चौकी कान्होलीबारा हिंगणा नागपुर येथे श्री शनि शक्तिपीठ वा आर्यभट्ट गुरुकुलम परिसरात कार्तिक पूर्णिमा रविवार 26 नोव्हेंबर रोजी, सकाळी ११ वाजता. भव्य विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. अशी माहिती आचार्य गुरुकुलचे अध्यक्ष आचार्य भूपेश गाडगे यांनी पत्रपरिषदेत दिली. ही भव्य मूर्ती एकाच 15 फूट पाषाणापासून बनलेली असून एवढी मोठी विठ्ठल मूर्ती भारतात कुठेही नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भारतातील सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण व माजी खासदार डॉ. रघुनाथ महापात्रा यांच्या आर्ट अँड क्राफ्ट फाउंडेशनद्वारे ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. विठ्ठल मूर्ती निर्माण करण्याचे आवाहान स्वीकारून अवघ्या ८ महिन्याच्या कालावधीत ही मूर्ती पूर्णत्वास आली आहे.

या मूर्ती सोबतच संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या 5 फूट उंच मुर्त्या तसेच आर्यभट्ट, नागार्जुन, चरक इत्यादी १० महान भारतीय संशोधनकर्त्यांच्या मुर्त्या येथे स्थापित करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे श्रीक्षेत्र चौकी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एकमेव बृहस्पती मंदिर असून या परिसरात श्री शनि शक्तीपीठ आर्यभट्ट गुरुकुलमची स्थापना जून 2019 मध्ये करण्यात आली व येथे भारतातील सर्वात मोठे सूर्य घड्याळ (सन डायल) वार यंत्र, सर्वात मोठे श्रीयंत्र आणि VNIT नागपूर द्वारा स्वयं संचालित केलेले भारतातील सर्वप्रथम तिथी व नक्षत्र यंत्र निर्माण करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल हे मूर्ती रूपाने येथे विराजित होत असून 17 टन वजनाची मूर्तीरुप नागपूरकरांना साक्षात दर्शन देणारी ठरणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर आयोजित या लोकार्पण कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहकुटुंब सहपरिवारा सोबत येऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. यावेळी उपस्थित राहण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आचार्य भूपेश गाडगे यांनी आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संविधान दिन चिरायू होवो च्या गजराने दुमदुमला कामठी तालुका

Sun Nov 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान भारत देशाला अर्पण केले .भारतीयांनी हे संविधान अंगीकृत करीत अधिनियमित केले .ह्या संविधान दिना निमित्त कामठी तालुक्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने संविधान दिन चिरायू होवो च्या गर्जना करीत कामठी तालुका दुमदुमला. यानुसार कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com