संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान भारत देशाला अर्पण केले .भारतीयांनी हे संविधान अंगीकृत करीत अधिनियमित केले .ह्या संविधान दिना निमित्त कामठी तालुक्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने संविधान दिन चिरायू होवो च्या गर्जना करीत कामठी तालुका दुमदुमला.
यानुसार कामठी च्या तहसिल कार्यालयात तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तर प्रस्तुतकार अमोल पौंड यांनी भारतीय संविधान प्रस्ताविक उद्देशिका चे सामूहिक वाचन केले व एकमेकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी ,नायब तहसिलदार सह आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली तर प्रदीप भोकरे यांच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी उपमुख्यधिकारी नितीन चव्हाण,कर अधीक्षक आबासाहेब मुंडे,स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां यासह न प अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कामठी पंचायत समिती कार्यालयात बीडीओ प्रदीप गायगोले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तर पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले याप्रसंगी विस्तार अधिकारी मनीष दिघाडे सह कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. , शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नैना धुपारे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी, यांच्या मुख्य उपस्थितीत संबंधित कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करीत संविधान दिन साजरा करन्यात आला.
भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी तसेच समता सैनिक दल च्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली. तसेच वीरेंद्र मेश्राम यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.याप्रसंगी समता सैनिक दल चे मार्शल ओमप्रकाश मेंढे सह ,समता सैनिक दल चे सदस्यगण उपस्थित होते.तसेच भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठीचे अध्यक्ष विजय पाटील, विद्याताई भीमटे,माजी नगरसेवक विकास रंगारी, कोमल लेंढारे,उमाकांत चिमनकर, मनोहर गणवीर, मंगेश खांडेकर आदी उपस्थित होते.
कांग्रेस तर्फे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहत आशिष मेश्राम यांच्या हस्ते संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे,माजी नगरसेविका ममता कांबळे,इर्शाद शेख, माजी नगरसेवक नीरज लोणारे,आकाश भोकरे, ,राजन कांबळे,, प्रमोद खोब्रागडे,,मंजु मेश्राम,कुसुमताई खोब्रागडे,सुरेय्या बानो, राजकुमार गेडाम,मो सुलतान ,मंजू मेश्राम,कुसुमताई खोब्रागडे आदी उपस्थित होते.
भाजप तर्फे भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत संविधान दिन चिरायू होवो चा गाजर करण्यात आला याप्रसंगी भाजप पदाधिकारी मनोज चवरे,अरविंद गजभिये, पुष्पराज मेश्राम, जितू खोब्रागडे, पृथ्वीराज दहाट, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते तसेच माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत संविधान प्रस्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेवक कपिल गायधने, माजी नगरसेवक प्रमोद वर्णम, पंकज वर्मा,विजय कोंडुलवार आदी उपस्थित होते.
बरीएम तर्फे शहराध्यक्ष दिपंकर गणवीर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले याप्रसंगी अनुभव पाटील,उदास बन्सोड, विनय बांबोर्डे, सागर भावे, मनीष डोंगरे, विलास बन्सोड आदी उपस्थित होते ,बसपा तर्फे इंजि.विक्रांत मेश्राम व विनय उके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करीत संविधान दिन चिरायू होवो च्या घोषणा देण्यात आल्या.यप्रसंगी बसपा नेते किशोर उर्फ भाऊसाहेब गेडाम, माजी नगरसेविका रमा गजभिये, नागसेन गजभिये, सुधा रंगारी,अनिल कुरील, निशिकांत टेंभेकर,विकास रंगारी, राजन मेश्राम,मनोज रंगारी आदी उपस्थित होते, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते मानवंदना वाहण्यात आली. प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी व डॉ बाबासाहेब आंबेडकर परिसर सौंदर्यीकरण समिती कामठी च्या वतीने अध्यक्ष प्रमोद खोब्रागडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक बुद्धवंदना करून संविधान प्रस्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी राजेश गजभिये, दिपंकर गणवीर,कोमल लेंढारे , उदास बन्सोड, मंगेश खांडेकर, राजन मेश्राम, आशिष मेश्राम,रायभान गजभिये, मनोज रंगारी आदी उपस्थित होते.