सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 145 प्रकरणांची नोंद,उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (9) रोजी शोध पथकाने 145 प्रकरणांची नोंद करून 86300 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 10 प्रकरणांची नोंद करून रु 2000रुपयांचा दंड वसुल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 1500 रुपयांचा दंड वसुल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10800 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 32 प्रकरणांची नोंद करून 3200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून रु 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आला. वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडिकल वेस्ट सर्वसाधरण कच-यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 25000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वर्कशाप, गॅरेजस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त इतर 35 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 7000 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 20 प्रकरणांमध्ये 20000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच हरित लवाद यांनी दिलेल्या दि.03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 5000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.

मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बंगाली कॅम्प चौक ते एमईएल टोल नाका चौक दुभाजकांची स्वच्छता व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे रस्ता,दुभाजकलगतची धुळ संकलीत  

Sat Dec 10 , 2022
चंद्रपूर :- बंगाली कॅम्प चौक ते एमईएल टोल नाका चौक दुभाजकांची स्वच्छता आज व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे करण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत तीन मशीन घेण्यात आल्या असुन जो कचरा मानवी प्रयत्नांनी स्वच्छ करता येत नाही तो स्वच्छ करण्याचे काम या व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीन करीत आहेत. मनपा स्वच्छता विभागामार्फत सर्व रस्ते झडाईद्वारे नियमित स्वच्छ करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!