सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 143 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शक्रवार (28) रोजी शोध पथकाने 143 प्रकरणांची नोंद करून 81600 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 43 प्रकरणांची नोंद करून 17200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली.

दुकानदाराने रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 23500 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविले अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु 8000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 46 प्रकरणांची नोंद करून रु 9200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून रु 16000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Tue Aug 1 , 2023
मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त मंगळवारी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, सहप्रभारी सुमंत घैसास, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!