134 मतदान यंत्र सिलिंग..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

कामठी ता प्र 15 :- येत्या 18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत च्या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी 90 उमेदवार तसेच 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ही निवडणूक 122 मतदान केंद्रावर होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर निवडणूक पूर्व मतदानाची तयारी म्हणून गुरुवार 15 डिसेंबर ला कामठी तहसील कार्यालयात 122 ईव्हीएम मशीन व राखीव 12 असे एकूण 134 मशीनची तपासणी करून सिलिंग करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या देखरेखेखाली मशीन सिलिंगची प्रक्रिया करण्यात आली.याप्रसंगी विशेषत्वाने उमेद्वारानीही उपस्थिती दर्शवली होती.

18 डिसेंबर ला होणाऱ्या ग्रा प निवडणुकीसाठी निवडणूक विभागासह प्रशासन सज्ज होऊन निवडणूक कामाला लागले आहेत .तर मतदानाची पूर्व तयारी म्हणून ईव्हीएम मशीन सिलिंग करण्यात येणार असून निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या देखरेखेखाली निवडणूक क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षक सह तालुक्यातील मंडळ अधिकारी , तलाठीनी मशिन सिलिंग चे कामे पाहले यावेळी उमेदवाराची विशेष उपस्थिती होती .मतदानाची प्रक्रिया पारदर्शक पणे पार पाडावी यासाठी निवडणूक विभाग विशेष लक्ष ठेवून आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघ प्रथम चंद्रपूर मनपा " शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा "

Thu Dec 15 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास १ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले असुन सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे विजेत्यांची घोषणा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com