लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या घरातून नगदी 13 लक्ष 44 हजार रुपये चोरीला..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 1:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील लाईफ लाईन हॉस्पिटल चे डॉक्टर तमीम फाजील मुक्तार अहमद यांच्या घरातून चार अज्ञात चोरट्यानी रोख 13 लक्ष 44 हजार रुपये चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457,380,34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गतरात्री अज्ञात चोरट्याने सदर फिर्यादी डॉ तमीम फाजील यांच्या घरातील टेरिसचे दार तोंडुन घरात अवैधरित्या प्रवेश करून बेडरूम चे दार तोडून बेडरूम मधील लाकडी आलमारी तोडून त्यामधील नगदी 13 लक्ष 44 हजार रुपये चोरून पसार झाले असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

@फाइल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रीपेड इलेक्ट्रॉनिक मीटर मोहीम रद्द करा-सुरेश भोयर..

Sat Jun 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 1:-महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्रिपेड इलेक्ट्रॉनिक वीज मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रात सुदधा ही मोहीम राबविण्यात येणार आहे मात्र ही मोहीम सर्वसामान्य जनतेच्या हिताची नसून गरीब जनतेला त्रास देऊन धनदांडग्यांना फायदा पोहोचविणारी आहे त्यामुळे ही प्रीपेड इलेक्ट्रॉनिक मोहीम रद्द करण्यात यावी अशी मागणी कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!