सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 118 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (13) रोजी शोध पथकाने 118 प्रकरणांची नोंद करून 43400 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 3 प्रकरणांची नोंद करून रु 600 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 30 प्रकरणांची नोंद करून 12000 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 2400 रुपयांची वसुली करण्यात आली.

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु 4400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 5000 दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.

या व्यतिरिक्त इतर 35 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 7000 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 11 प्रकरणांमध्ये 11000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्मार्ट सिटी तर्फे १५ फेब्रुवारी रोजी 'सायक्लोथॉन'

Tue Feb 14 , 2023
नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत येत्या बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता ‘फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ कार्यक्रमाचे आयोजन झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे करण्यात आलेले आहे. स्मार्ट सिटी मिशन, केन्द्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या निर्देशाप्रमाणे सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com