नागपूर ग्रामीण घटकातील ११०४ किलो अंमली पदार्थ नाश

नागपूर :- दिनांक १९.०९.२०२१ रोजी पोलीस स्टेशन बुट्टीबोरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण कडुन करण्यात आलेल्या कार्यवाही मध्ये ट्रक क्रमांक आर जे २७ जी ए ८८०४ मधुन एकूण ११०४ किलो अंमली पदार्थ (गांजा) जप्त करण्यात आला होता. सदर अंमली पदार्थ आज दिनांक २८.०८.२०२३ रोजी १२. ०० वा सर्व संबंधीत विभागाकडुन परवानगी घेवुन व दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करून   छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक नागपुर परीक्षेत्र नागपुर,  विशाल आनंद पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा नागपुर, किश्वा पानसरे पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, नागपुर पटक, डॉ संदीप पखाले, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे उपस्थितीत उच्च स्तरीय अंमली पदार्थ नाश समिती समक्ष भांडेवाडी नागपुर येथील मे. सुपर्व हायजेनिक डिस्पोजल याचे जैव-वैद्यकीय घनकचरा संयंत्राद्वारे नाश करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल 

Tue Aug 29 , 2023
मौदा :- अंतर्गत मौजा तारसा जॉईड १२ किमी पश्चिम येथे दि. २७/०८/२३ रोजी नेहमीप्रमाणे आपलेच घरी मोटर पंप दूरुस्ती करण्याचे काम करतात, आजूबाजूचे गावातील शेतकरी लोक त्यांचे घरी मोटर पंप दूरुस्ती करण्याकरीता आणतात. दि. २७/०८/२३ चे सकाळी ०७/०० वा फिर्यादी हे घराबाहेर गेले व ०८/०० वा घरी परत येत असता, आरोपी नामे- मंगेश वसंत गिहाने वय ३० वर्ष बेलोरी ता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com