यवतमाळ :- रविवार दि. 11.08.2024 ला यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्था तर्फे 10वी व 12वी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अमन यांचे पीए सुकांत वंजारी, यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, दे. लोकमतचे कॅशियर प्रमोद मांडळे , राज्य संघटनेचे उपाध्यक्ष संतोष शिरभाते यांच्या हस्ते मा सरस्वती यांच्या प्रतिमेला पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक किरण कोरडे यांनी केले सूत्रसंचालन किशोर भेदरकर यांनी केले . मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, रजिस्टर या भेटवस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे दिली आहे. ओम कोरडे, वरूण शिंदे, निखिल पाचकोर, शुभम चव्हाण ,साहिल शेख जलील ,प्रतीक नेहाटे, संदेश वाघमारे, गौरव नागोसे ,युवराज चंपारीया ,अभिषेक जाधव, कु. श्रावणी उईके, कु.आरुषी बढाये ,आर्यन बढाये ,प्रीतम तिवाडे, यश गणात, गोपाल गौरकार ,उमेश सहारे ,आरव पाटील, नयन टिके या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यातआला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेचे उपाध्यक्ष राजू हनवते ,राजू भलावी, कोषाध्यक्ष श्रीराम खत्री, सल्लागार मदन केळापुरे, सहसचिव तुषार गुजलवार, प्रसिद्धी प्रमुख सचिन कदम, सदस्य सुनील बोरकर, रवींद्र चव्हाण, आणि ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते श्रीपाद तोटे ,राजेश काळे, कमल नयन कोठारी आणि ,वृत्तपत्र विक्रेत सदस्य गण उपस्थित होते. आभार प्रदर्शन राजू हनवते यांनी केले. असे श्रीराम खत्री यांनी कळविले.