नागपूर :- इंडियन जिमखाना क्लब धंतोली नागपूर यांचे वार्षिक आमसभा जिमखाना क्लब धंतोली येथे क्लब च्या हॉल मध्ये रविवारी 27 ऑक्टोबर रोजी पार पडली. जिमखाना क्लबचे अध्यक्ष शरद दुरागकर यांच्या अध्यक्षतेखाली क्लबचे सचिव विलास हरडे यांनी दीपप्रज्वलन करून गणपतीच्या फोटोला हार घालून सन 2023-24 चा वार्षिक अहवाल सादर केला.
कोषाध्यक्ष बिपिन बोंडे यांनी आर्थिक अहवाल सादर केला. व विलास हरडे यांनी क्लब मध्ये झालेले व्यवहार व तसेच क्लब मध्ये झालेल्या अचीवमेंट, डेव्हलपमेंट व पुढील अनेक वर्षाचे नियोजन व आणखीन प्रगती कशी करू याबद्दल आमसभेला माहिती दिली. तसेच सभेत माजी अध्यक्ष चंद्रकांत गुंडेवार व अन्य पदाधिकारी प्रवीण तुराटे, विनय झाडे, अभय क्षीरसागर, चंद्रकांत येवले, डॉ.ए.आर. आंबईकर, सुनीत माहेश्वरी, जयंत कुळकर्णी, राजकुमार कोठारी आणि सभेला क्लब ची सभासद अनिल वडपल्लीवार, घनश्याम राठी, राजीव जगताप, अनिल केडिया, तेलंग, प्रशांत पाध्ये व अन्य मानवाईक व्यक्ती आणि कर्मचारी उपस्थित होते.