सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १०१ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर केल्या जात आहे.  बुधवारी (ता. १) रोजी उपद्रव शोध पथकाने १०१ प्रकरणांची नोंद करून ५२९०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३० प्रकरणांची नोंद करून १२,००० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून १२०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून रु २००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. २०००/- दंड) या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून रु १४५०० दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर ३१ व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून ६२०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून ०९ प्रकरणांमध्ये ९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

RTE 25% reservation. Eligibility Criteria and Entitlement

Thu Mar 2 , 2023
Nagpur :-Right to education is a Governments Initiative Under the fundamental right of every child to be provided free elementary education. The parents falling in the EWS category and those who cannot afford to pay the school fee of a private school have been greatly benefited by this initiative. Certain reputed and private schools who are registered under RTE have […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com