नवेगाव खैरी धरणाचा १०० % जलसाठा, दोन दरवाजे उघडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- मध्य प्रदेशात होत असलेल्या पावसाने चौराई धरणाचा जलसाठा वाढुन दोन दरवाजे उघडल्याने तोतलाडोह धरणाचा जलसाठ्यात वाढ होत नवेगाव खैरी (पेंच) धरणाचा जलसाठा १००% झाल्याने (दि.९) ला सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडुन पाण्याचा पेंच व कन्हान नदीत विसर्ग करण्यात येत आहे.

रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात या वर्षी मानसुन उशिरा आला असुन सध्याच्या परिस्थितीत अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. काही दिवसापुर्वी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पारशिवनी तालुक्यात १४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुरवारला सुद्धा पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने विश्राम घेतला आहे. मध्यप्रदेशात सतत अधुन मधुन होत असलेल्या पावसा ने चौराई धरणाचे शुक्रवार (दि.४) ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता दोन दरवाजे ०.९० मी व दोन दरवाजे ०.३० मी ने उघडल्याने त्यातुन ५७२.२८ क्यु मेक्स विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याने तोतलाडोह धरणाचा जलसाठा वाढ्याने काही दिवसापुर्वी तोतलाडोह धरणाचे काही दरवाजे उघडले.

दोन्ही धरणात जलसाठा वाढत असल्याने धरण सुस्थितीत व नियंत्रणाकरिता (दि. ८) ऑगस्ट रात्रीला नवेगांव खैरी पेच धरणाचा एफआरएल ३२५.०० मी च्या बरोबर पाण्याची पातळी ३२५.०० मी म्हणजे जलसाठा १०० % झाल्या ने बुधवार (दि.९) ऑगस्ट ला सकाळी ६ वाजता धरणाचे ०२ वक्रद्वार (गेट) ०.१५ मी ने उघडुन पेंच व कन्हान नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यास्तव नदी काठालगत गावकयांनी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन पेंच पाटबंधारे पारशिवनी उपविभागीय अभियंता  एन. एस. सावरकर हयांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवा चेतना मंच तर्फे वर्धापन दिन साजरा

Wed Aug 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- युवा चेतना मंच च्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कामठी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूजन करून याप्रसंगी सामुहिक शिवस्तुती घेण्यात आली . सोबतच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचावे याकरिता स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप कामठी येथील मॅक्झिन कम्प्युटर ईस्टीट्युट येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com