सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 100 प्रकरणांची नोंद,उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (15) रोजी शोध पथकाने 100 प्रकरणांची नोंद करून 67000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणा-यांवर 5 प्रकरणांची नोंद करून रु 1000 रुपयांचा दंड वसुल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7200 रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 1900 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु 1600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 20000 दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आला. वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधरण कच-यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 10000 दंड वसूल करण्यात आला.या व्यतिरिक्त इतर 29 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 5800 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 13 प्रकरणांमध्ये 13000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Short film competition organized by RTMNU Mass Comm Dept on ‘College Ke Din’, Ambedkar, Raisoni win top honours at CineStory

Thu Feb 16 , 2023
NAGPUR : “The art of story-telling matters more in film making than how expensive your camera is,” said acclaimed film and documentary maker, Mr. Aditya Sharma. He was speaking as the chief guest at the Awards Ceremony of ‘CineStory’ a university-level short film making competition. The competition was organized by the Department of Mass Communication, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com