संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छावणी परिषद परिसरात सेवानिवृत्त सैन्य कर्माचाऱ्याने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल दुपारी 2 वाहेदरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादीने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सैन्य कर्मचारी शशिकांत थॉमस वय 67 वर्षे रा छावणी परिषद कामठी विरुध्द भादवी कलम 354,सहकलम 8,12 पोक्सो सहकलम 3(1) आदी कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.