– आपसी व्यवसायिक स्पर्धेतून घडली घटना!
वाडी :- वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दवलामेटी येथे राहणाऱ्या युवकांने आपल्या तीन ते चार साथीदारासह शेजारी राहणाऱ्या कंत्राट दाराच्या घरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दिनेश बाबुलाल बिसेन वय-३८ वर्ष रा. शिवशक्ती आदिवासी गृहनिर्माण सोसायटी,दवलामेटी हे घर बांधकामाचे कंत्राटदार आहेत. तर बाजूलाच असलेले त्यांचे मावस भाऊ राहुल पटले वय-३० वर्ष हेही बांधकाम व्यवसायात आहे. या बांधकाम व्यवसायावरून दोघात बऱ्याच वर्षापासून स्पर्धा सुरू आहे. नुकतेच दिनेश बिसेन यांनी आपल्या कामावर इतर राज्यातून आणलेल्या मजुरांना काम दिले असता राहुल पटले यांने या मजुरांना बिसेन च्या कामावर जायचे नाही असे धमकावले यावरून मजूर काम सोडून गेल्याने दिनेश चा व्यवसाय ठप्प झाला. या घटनेवरून दोघात मागील काही दिवसापासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्री ११ वा.चे दरम्यान राहुल पटले हा आपले तीन ते चार साथीदार घेऊन दिनेश बिसेन यांच्या घरावर चालून आला व खिडकीचे काचा,आत असलेली एलईडी टीव्ही,टाटा एस गाडीचा काच व खुर्च्या ची पूर्णता तोडफोड केली व घरात शिरुन उपस्थित असलेल्या बिसेन परिवाराला मारहाणही केली या मारहाणीत दिनेश बिसेन कसाबसा आपला जीव मुठीत घेऊन घटनास्थळावरून पळाला व वाडी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेतला असता ते दिसून आले नाही. या प्राणघातक हल्ल्यात जवळपास ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते.तदनंतर वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४४८,४५२,४२७,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेने सुरू आहे.अद्याप आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर असल्याचे समजते.
@ फाईल फोटो