लोकसेवा देणाऱ्या विभागांच्या माहितीसाठी आपले सरकार पोर्टल, नागरिकांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

– शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध

नागपूर :- लोकसेवा देणाऱ्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विहित कालावधीत सेवा न मिळाल्याबद्ल तसेच सेवा मिळण्यासंदर्भात अडचणी आल्यास महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सर्व सेवा ऑनलाईन देण्यात येत आहेत. तसेच या सर्व सेवांसाठी आपले सरकार पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी केले आहे.

राज्यातील जनतेला पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या कलम 3 नुसार अधिसूचित केलेल्या सेवेचा लाभ नागरिकांना घेता यावा यासाठी आपले सरकार पोर्टल सुरु करण्यात आले आहेत. शासकीय व निमशासकीय तसेच इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त यांनी शासनाच्या सर्व सेवा 1 जानेवारी 2023 पासून ऑनलाईन स्वरूपात देण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना सुलभतेने जलदगतीने सेवा मिळावी यासाठी अधिनियमाचा वापर करावा, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

Fri Jul 7 , 2023
नागपूर :- प्रत्येक‍ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 10 जुलै 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा तसेच जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतीसह विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (गोसेखुर्द) घनश्याम भूगांवकर यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com