संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9:- ,स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गादा येथे करंट लागून तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारला रात्री आठ वाजता सुमारास घडली असून अनिकेत मनोज सिंग वय 18 असे मृत तरुणाचे नाव आहे. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गादा येथे इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीच्यावतीने कन्हान नदी येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून या योजनेच्या बाधकामाकरिता बिहार राज्यातून एकशे पन्नास कामगार काम करण्यासाठी आणले आहेत त्यांची राहण्याची सोय कंपनीच्या वतीने गादा गावात भाड्याची खोली घेऊन करण्यात आली आहे त्या खोलीत अनिकेत मनोज सिंह सह 10 कामगार वास्तव्यास होते रात्री आठ वाजता अनिकेत मनोज सिंग जेवण केल्यानंतर झोपण्या करिता गेला असता त्याला करंट लागून मृत्यू झाला अनिकेत मनोज सिग हा राहणार भिका , तालुका वलासीया ,जिल्हा अररिया, बिहार राज्यातील रहिवासी असून गेल्या तीन महिन्यापासून गादा येथे इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीमध्ये काम करून वास्तव्यास होता अनिकेत मनोज सिंग करंट लागून मृत्यू झाल्या च्या घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशनला दिली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले कंपनी कडून मृत तरुणांच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी काही कामगारांनी केल्याने काही काळ उपजिल्हा रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली होती कंपनी कडून आश्वासन दिल्याने मृत तरुणाचे शवविच्छेदन करून प्रेत मृत तरुणाचे मूळ गावी बिहार राज्यात अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले न नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले करीत आहेत