योगसाधना ही लोक चळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- “बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.            वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय,ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती मुंबई,भारत खाद्य निगम ईसीजीसी लि.सीप्झ-सेझ मुंबई, सीआयसीएफ, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे राजीव जलोटा, टाटा मेमोरियलचे डॉ. अमित गुप्ता, पतंजली समूहाचे अध्यक्ष सुरेश यादव, धर्मवीर शास्त्री तसेच विविध शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “वसुधैव कुटुंबकम् ही योगदिनाची संकल्पना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत आहेत. योग दिवस सुरू करून आज 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. संयुक्त राष्ट्र संघामध्ये योगा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य करून 200 पेक्षा जास्त देशांनी याचा स्वीकार केला आहे. आपल्या देशाने आरोग्याची गुरुकिल्ली संपूर्ण जगाला दिली आहे. योगा करा स्वस्थ रहा, योगा करा निरोगी रहा”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

पीयूष गोयल म्हणाले की,आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रधानमंत्री आज आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या देशाच नाव जगाच्या पाठीवर नेण्याचं काम करत आहेत. योगाचे फायदे व महत्त्व त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून सांगितले. कोविड कालावधीमध्ये बोलण्याचा त्रास होत होता. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला प्राणायाम करण्याचा सल्ला दिला आणि आज मला व्यवस्थित बोलता येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी फिटनेस गुरु सुरेश यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा परिषदेत होणार मेगाभरती

Wed Jun 21 , 2023
557 पदांसाठी राबविण्यात येणार भरतीप्रक्रिया नागपूर :- शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेत यंदा मेगाभरती होणार असून विविध संवर्गातील 557 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली. जिल्हा परिषदेतील सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेले विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com